Shubham Banubakode
जितेश शर्मा हा आरसीबीचा यष्टिरक्षक फलंदाज आहे. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९९३ रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला.
जितेश शर्माच्या ८५ धावांच्या खेळीच्या भरवश्यावर आरसीबीने क्वालिफायर-१ मध्ये स्थान मिळवलं. त्याच्या नेतृत्वात आरसीबीने लखनऊचा ६ गडी राखून पराभव केला.
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात RCB ने जितेशला ११ कोटी रुपयांना विकत घेतले.
जितेश शर्मा यांची एकूण संपत्ती अंदाजे १४-१५ कोटींच्या घरात आहे. तो प्रामुख्याने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमधून कमाई करतो.
जितेशने भारतासाठी ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, त्यात १०० धावा केल्या आहेत. तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६६१ धावा, लिस्ट-ए मध्ये १,५३३ धावा आणि टी-२० मध्ये २,८६२ धावा केल्या आहेत.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये जितेश विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने अनेक महत्त्वाच्या सामन्यांत आपल्या संघासाठी निर्णायक खेळी केल्या आहेत.
जितेशने पंजाब किंग्स (PBKS) कडून खेळत आयपीएलमध्ये आपली ओळख निर्माण केली. मधल्या फळीतील त्याच्या विस्फोटक खेळीने सर्वांचे लक्ष वेधले.
मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या जितेशला लहानपणापासून क्रिकेटची आवड होती. त्याचे वडिलांनी त्याला संत गजानन क्रिकेट अकादमीत दाखल केले.
मीडिया रिपोर्टनुसार, जितेशला भारतीय लष्करात सामील व्हायचे होते. मात्र, वडिलांच्या इच्छेमुळे त्याने क्रिकेटला प्राधान्य दिले.