जीवन सुलभ करणाऱ्या लिफ्टचा शोध कोणी लावला?

अंकिता खाणे (Ankita Khane)

एखादी उंच इमारत दिसली की आपण लगेचच लिफ्ट शोधू लागतो. हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे, परंतु याचा शोध कोणी लावला याचा कधी विचार केला आहे का?

लिफ्ट हा आपल्या आयुष्याचा एक भाग बनला आहे.

आता आधुनिक लिफ्ट केबल्सद्वारे चालतात, जे 25 ते 50 लोकांचे वजन हाताळू शकतात.

अशा स्थितीत लिफ्टचा शोध कोणी आणि कसा लावला असेल हा प्रश्न फार कमी लोकांच्या मनात आला असेल.

किंबहुना, लिफ्टचा विकास बघितला तर हे कोणा एका व्यक्तीच्या मेहनतीचे फळ नाही. उलट शास्त्रज्ञांच्या सततच्या प्रयत्नांचे हे फळ आहे.

रोमन काळात इमारत बांधणे, पूल बांधणे यासारख्या कामांसाठी लिफ्टसारख्या यंत्राचा शोध लागला.

रोमन अभियंता व्हिट्रुवियस पोलिओने माल उचलण्यासाठी आणि खाली करण्यासाठी पुलीचा वापर करून एक मशीन तयार केले होते.

1852 मध्ये, अलिशा ग्रेव्हज ओटे यांनी लिफ्टमध्ये सुरक्षा उपकरणे बसवून लोकांना वरून खाली आणण्याचे काम सुरू केले. अशा प्रकारे, लिफ्ट हळूहळू विकसित झाली जी आज आपण वापरत आहोत.

वारंवार उकळ्याने चहाचं होऊ शकतं विष; हिवाळ्यात घ्या विशेष काळजी

tea