Puja Bonkile
दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा केला जातो.
कारण याच दिवशी फ्लोरेन्स नाईटिंगेल यांची जयंती साजरी केली जाते.
परिचारिकांचा सन्मान करण्यासाठी १९७४ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन साजरा करण्यात आला.
डॉक्टरांप्रमाणेच नर्स देखील रूग्णांची काळजी घेतात.
पण नर्स म्हणजे नमकं काय हे जाणून घेऊया.
रुग्णांची थेट काळजी घेणे आणि रुग्ण, कुटुंबे आणि समुदायांसाठी एक वकील आणि आरोग्य शिक्षक म्हणून काम करणे हे नर्सिंगचे मूलभूत तत्व आहे.
नर्स आरोग्याला प्रोत्साहन देण्यासाठी, आजार रोखण्यासाठी आणि आजारी रुग्णांना मदत करण्यासाठी काम करतात.