Sandip Kapde
पुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये बलात्कार करणाऱ्या दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली.
न्यायालयाने दत्ता गाडे याला १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दत्ता गाडे याचे वकीलपत्र वाजिद खान बिडकर यांनी घेतले आहे.
वाजिद खान यांनी न्यायालयात हा संबंध सहमतीने झाल्याचे सांगितले.
लहानपणी त्यांच्या मित्राच्या वडिलांनी गणित कच्चे असेल तर वकील होण्याचा सल्ला दिला होता.Who is Wajid Khan Bidkar
वाजिद खान २००८ मध्ये वकील झाले आणि त्यांनी फौजदारी प्रकरणांवर लक्ष केंद्रित केले.
बाबरी मशिद आणि राम मंदिर प्रकरणानंतर वाजिद खान यांना वकील होण्याची प्रेरणा मिळाली.
हायकोर्टात काम करत असताना त्यांनी कडूबाई या वृद्ध महिलेची केस जिंकली.
वाजिद खान मनोज जरांगे यांचे सल्लागार असल्याचे सांगतात.
ते कौटुंबिक प्रकरणांमध्ये पुरुषांचीच बाजू लढतात, महिलांची केस ते घेत नाहीत.
याचे कारण सांगू इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वाजिद खान इन्स्टाग्रामवरही प्रसिद्ध असून ते विविध विषयांवर रिल्स बनवतात.
२०१२ मध्ये वाजिद खान छत्रपती संभाजीनगर येथून पुण्यात स्थायिक झाले.
बिग बॉसची ऑफर आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.
त्यांच्या निर्णयांमुळे ते कायम चर्चेत राहतात. एका मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली आहे.