कोण आहे आर्यमन? RCB घेतली विकत, जुना सहकारी आहे कॅप्टन

सकाळ डिजिटल टीम

आर्यमन बिर्ला

आर्यमन बिर्ला हे सुप्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला याचे सुपुत्र आहेत. आर्यमन हेसुद्धा आता उद्योगपती आहेत; परंतु त्याअगोदर त्यांनी क्रिकेटमध्ये छोटीशी; पण लक्षवेधी कारकीर्द केलेली आहे.

Aryaman Birla

|

Esakal

क्रिकेट

वयाच्या १७व्या वर्षी आर्यमन हे मुंबई सोडून मध्य प्रदेश क्रिकेटमध्ये दाखल झाले; पण त्याअगोदर त्यांच्याकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव होता. तेथे वेस्ट हॅम्पस्टेड क्रिकेट क्लब लंडन स्कूल क्रिकेटमध्ये ते खेळले होते.

Aryaman Birla

|

Esakal

रणजीत पदार्पण

मिडलसेक्स संघाचे माजी खेळाडू पॉल विक्स यांच्या मार्गदर्शनाखाली आर्यमन खेळत होते. २०१७ मध्ये देशातील महत्त्वाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेत त्यांनी मध्य प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करण्यास सुरुवात केली.

Aryaman Birla

|

Esakal

चमकदार कामगिरी

आर्यमन हे २०१८ ते १९ या वर्षात एकूण नऊ प्रथम श्रेणी सामने खेळले, त्यात आठ रणजी सामन्यांचा समावेश आहे. ऐतिहासिक ईडन गार्डनवर बंगाल संघाविरुद्ध दुसऱ्या डावात नाबात शतकी खेळी करून मध्य प्रदेश संघाचा पराभव टाळला होता.

Aryaman Birla

|

Esakal

सहकारी कर्णधार

रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर हे मध्य प्रदेश संघातील त्यांचे सहकारी होते. हाच रजत पाटीदार आयपीएलमध्ये बंगळूर संघाचा कर्णधार आहे आणि त्याच संघाचे संचालक आर्यमन बिर्ला असणार आहे.

Aryaman Birla

|

Esakal

आयपीएल

रणजी स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाने २०१८ मध्ये आर्यमन यांना आपल्या संघात घेतले; पण एकही आयपीएल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Aryaman Birla

|

Esakal

उद्योग

वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. क्रिकेटमधून ब्रेकनंतर आर्यमन उद्योगात दाखल झाले. आदित्य बिर्ला समूहात ते नेतृत्वाच्या भूमिकेत आहे.

Aryaman Birla

|

Esakal

शिक्षण

मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्सच्या पदवीपासून ते हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए (हॉनर्स), बेयेस बिझनेस स्कूलमधून ग्लोबल फायनान्समध्ये मास्टर्स अशा पदव्या आहेत.

Aryaman Birla

|

Esakal

कोण आहे अशोक खरात? ८ वी पास, घरातून पैसे घेऊन पळाला, २००३ ला आमदाराने वाचवलं नसतं तर...

Ashok Kharat

|

Esakal

इथं क्लिक करा