सूरज यादव
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या युरोप दौऱ्यात प्रश्न विचारल्यानं चर्चेत आलेल्या नॉर्वेच्या महिला पत्रकाराचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय.
helle lyng
Esakal
ओस्लोमध्ये पंतप्रधान मोदी प्रेस ब्रिफिंगनंतर जात असताना हेली लेंग हिने प्रश्न विचारला होता. त्याला भारताच्या परराष्ट्र खात्याकडून उत्तरही देण्यात आलंय.
helle lyng
Esakal
प्रेस फ्रीडम आणि मानवाधिकाराच्या मुद्द्यावरून हेली लेंग हिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट सवाल केला होता.
helle lyng
Esakal
हेली लेंगला यानंतर सोशल मीडियावर ट्रोलही केलं जात आहे. चार वर्षे ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हती यावरही शंका उपस्थित होतेय.
helle lyng
Esakal
हेली लेंग ही डागसाविसेन वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम करते. गेल्या चार ते पाच वर्षांपासून ती या क्षेत्रात कार्यरत आहे.
helle lyng
Esakal
हेली लेंग हिने ट्विटरवर पोस्ट करत म्हटलं की, पत्रकार स्वातंत्र्यासाठी ही लहानशी किंमत मोजावी लागली. पण असा अनुभव कधीच आला नाही.
helle lyng
Esakal
माझं फेसबुक, इन्स्टाग्राम बंद झालंय. मला आशा आहे की मेटाकडून लवकर अकाउंट सुरू केली जातील अशी पोस्ट तिने ट्विटरला केलीय.
helle lyng
Esakal
वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स रँकिंगचा उल्लेख करत हेले लेंगनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला होता.
helle lyng
Esakal
Lahor
Esakal