सकाळ डिजिटल टीम
नीरज चोप्राने रविवारी सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.
ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राने हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केले आणि फोटो पोस्ट केले.
हिमानी कोण आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
नीरजची पत्नी हिमानी अमेरिकेत शिकत आहे. सोनीपतच्या हिमानीने टेनिसमध्येही हात आजमावला आहे.
हिमानी मोर सध्या अमेरिकेत शिकत आहे. ती फ्रँकलिन पियर्स विद्यापीठातून स्पोर्ट्स मॅनेजमेंट (मेजर) शिकत आहे.
हिमानीने दिल्लीच्या मिरांडा हाऊस मधून राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षणात पदवी प्राप्त केली आहे.
हिमानी फ्रँकलिन पियर्स युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे.
हिमानीने २०१७ मध्ये जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
हिमानी मोरने सोनीपतच्या लिटल एंजल्स स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सुमित नागल यानेही याच शाळेतून शिक्षण घेतले आहे.