IIT टॉपर ते २५व्या वर्षी IAS, कोण आहेत जरांगेंसोबत चर्चा करणाऱ्या आशिमा?

सूरज यादव

आशिमा मित्तल

राजस्थानमधील जयपूरच्या असलेल्या IAS आशिमा मित्तल सध्या जालन्याच्या जिल्हाधिकारी आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळात त्यांचा समावेश आहे.

IAS Ashima Mittal

|

Esakal

२०१८ बॅच

आशिमा मित्तल या २०१८च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी युपीएससीत यश मिळवलं.

IAS Ashima Mittal

|

Esakal

अभ्यास

लहानपणापासून अभ्यासात हुशार असलेल्या आशिमा वर्गात नेहमीच अव्वल यायच्या. इतकंच नाही तर ज्या स्पर्धात भाग घ्यायच्या तिथंही यश मिळवायच्या.

IAS Ashima Mittal

|

Esakal

आयआयटी

शाळेपासून आयआयटी बॉम्बेपर्यंत त्यांनी यशाची परंपरा कायम राखलं. आयआयटी बॉम्बेमधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. आयआयटी टॉपर बनत सुवर्णपदकही पटकावलं.

IAS Ashima Mittal

|

Esakal

प्रोजेक्ट

आयआयटीतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्लीत मानववंशशास्त्र विषयातून एमए पूर्ण केलं. त्याच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने झोपडपट्टी भागातही त्यांनी काम केलंय.

IAS Ashima Mittal

|

Esakal

नोकरी सोडली

युपीएससी करण्याआधी त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत कामही केलं. शेवटी नोकरी सोडून युपीएससीची तयारी सुरू केली.

IAS Ashima Mittal

|

Esakal

अपयश

आशिमा यांना पहिल्या प्रयत्नात अपयश आलं. तर दुसऱ्यावेळी २०१६ ला ३२८ वी रँक मिळाल्यानं आयआरएसमध्ये संधी मिळाली. पण आयएएस होण्याचं स्वप्न दूर होतं.

IAS Ashima Mittal

|

Esakal

महाराष्ट्र केडर

आशिमा मित्तल या महाराष्ट्र केडरच्या २०१८च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. डहाणुत त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम केलंय.

IAS Ashima Mittal

|

Esakal

नाशिक-जालना

आशिमा मित्तल या नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओसुद्धा होत्या. वर्षभरापूर्वीच जालन्याच्या जिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालीय.

IAS Ashima Mittal

|

Esakal

व्हेल माशाची उलटी इतकी महाग का असते? कशासाठी वापर करतात?

whale shark |

sakal

इथं क्लिक करा