Mansi Khambe
एका इंडोनेशियन मुलाने बोटीच्या पुढच्या बाजूला नाच करत इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे "ऑरा फार्मिंग" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक ट्रेंडला सुरुवात झाली आहे.
इंडोनेशियातील रियाऊ येथील ११ वर्षीय रेयान अर्खान दिखा, जो काळ्या पारंपारिक पोशाखात आणि सनग्लासेस घातलेला आहे.
त्याला सोशल मीडियावर "द अल्टिमेट ऑरा फार्मर" असे म्हटले जात आहे. त्याने एका पातळ बोटीच्या टोकावर उभा राहत सुंदर हावभाव केले. या व्हिडिओला जगभरात लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
ऑरा फार्मिंग हा शब्द कदाचित असामान्य वाटेल. परंतु इंटरनेटवर आता तो आत्मविश्वास, शैली आणि चांगल्या भावनांचे प्रतीक आहे.
डिका नावाने ओळखला जाणारा इंडोनेशियन मुलगा "पाकू जलूर" नावाच्या स्थानिक कार्यक्रमात भाग घेत होता. ज्याचा अर्थ "बोट शर्यत" असा होतो.
१७ व्या शतकाच्या सुरुवातीपासून चालत आलेली ही परंपरा आता दर ऑगस्टमध्ये इंडोनेशियन स्वातंत्र्य दिनासाठी आयोजित केली जाते.
पाकू जलूर २०१५ पासून इंडोनेशियाच्या अमूर्त सांस्कृतिक वारशांपैकी एक आहे. येथील लोकांसाठी हा नेहमीच जीवनाचा एक भाग राहिला आहे.
या शर्यतीत, संघ लांब, डोंगीसारख्या बोटींमध्ये स्पर्धा करतात. रेयान हा केवळ एक सहभागी नव्हता, तर त्याने तोगाक लुआनची भूमिका बजावली.
रेयान बोटीच्या टोकावर बसलेला नर्तक होता. ज्याचे काम रोअर्समध्ये मनोबल आणि ऊर्जा वाढवणे आहे.
या प्रसिद्धीने केवळ जागतिक लक्ष वेधले नाही तर अधिकृत मान्यता देखील मिळवली. रेयान अर्कान दिखाला आता रियाउ प्रांताचा पर्यटन राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.