Pranali Kodre
आयपीएल २०२५ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सला ६ विकेट्सने पराभूत करत क्वालिफायर १ चे तिकीट मिळवले.
अमरावतीत जन्मलेला जितेश शर्मा बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
कर्णधाराला साजेशी अशी त्याने ३३ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकारांसह सर्वाधिक ८५ धावांची नाबाद खेळी केली.
जितेशच्या खेळानंतर तो चर्चेत आला आहे. ३१ वर्षीय जितेशसाठी त्याची पत्नी त्याचा सर्वात मोठा पाठिंबाही ठरत आहे.
जितेशच्या पत्नीचे नाव शलाका माकेश्वर असून त्यांनी बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर ८ ऑगस्ट २०२४ रोजी लग्न केले होते.
पुण्याची असलेली शलाका उच्चशिक्षित आहे. रिपोर्ट्सनुसार शलाकाने VLSI डिझाइनमध्ये एम.टेक केले आहे आणि सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये करिअर केले आहे.
ती सध्या नागपूरमधील एका आयटी कंपनीत इंजिनियर म्हणून नोकरी करते.