Saisimran Ghashi
अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि त्यांची पत्नी डॉ. कामना मिश्रा यांचे नाते खूप खास आहे.
कामना मिश्रा आणि शुभांशु शुक्ला यांची ओळख प्राथमिक शाळेत तिसरी इयत्तेत झाली.
दोघे एकत्र शिकले आणि तेव्हाच त्यांच्यात मैत्री झाली. पुढे कुटुंबाच्या संमतीने त्यांनी लग्न केले.
त्या कॉलेजमध्ये खूप हुशार आणि अभ्यासू विद्यार्थिनी होत्या. कामना या पेशाने डेंटिस्ट आहेत.
कामना आणि शुभांशु यांना सिड नावाचा एक मुलगा आहे.
एका मुलाखतीत कामना म्हणाल्या, "शुभांशु खूप लाजाळू , शांत, नम्र आणि मृदुभाषी आहेत."
कामना यांच्या मते, शुभांशु यांचे पहिले प्रेम नेहमीच आकाश आणि अंतराळ राहिले आहे.
शुभांशुच्या अंतराळ मोहिमेसाठी कामना यांनी त्यांना खूप समजून घेतले आणि मानसिक आधार दिला.
बालपणापासून सुरू झालेली त्यांची मैत्री आता विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्यात बदलली आहे. त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवला आहे.
कामना आणि शुभांशु एक परिपूर्ण जोडी आहे. त्यांचे प्रेम, मैत्री आणि स्वप्ने एकत्र आहेत.