सूरज यादव
प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर होणाऱ्या परेडमध्ये ऐतिहासिक बदल होणार आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलातील २६ वर्षीय असिस्टंट कमांडंट सिमरन बाला पुरुष जवानांच्या तुकडीचं नेतृत्व करणार आहे.
Who Is Simran Bala
Esakal
सीआरपीएफच्या १४० पेक्षा जास्त पुरुष जवानांच्या तुकडीचं नेतृत्व महिला करणार आहे. जम्मू काश्मीरच्या नौशेरा इथं सिमरन बाला राहते.
Who Is Simran Bala
Esakal
सिमरन तिच्या जिल्ह्यातली पहिली महिला आहे जी सीआरपीएफमध्ये ग्रुप ए अधिकारी म्हणून नियुक्त झालीय. तिने युपीएससी सीएपीएफ परीक्षेत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवलं होतं.
Who Is Simran Bala
Esakal
प्रजासत्ताक दिन परेडसाठी गेल्या एक महिन्यापासून ती सराव करत आहे. ग्रुप कोऑर्डिनेशन, अचूक ड्रील, कमांड यावर तिने विशेष लक्ष दिलंय.
Who Is Simran Bala
Esakal
सिमरनचं पहिलं पोस्टिंग नक्षलग्रस्त भागातील छत्तीसगढच्या बस्तरिया बटालियनमध्ये झालं होतं. तिथे तिनं चांगली ओळख निर्माण केली. याचा फायदा तिला परेडच्या नेतृत्वासाठी झाला.
Who Is Simran Bala
Esakal
स्वत:वर विश्वास ठेवा आणि मोठं स्वप्न पाहा, त्यासाठी कष्ट करा असा संदेश देत सिमरनने प्रत्येक क्षेत्रात सक्षम आणि कटिबद्ध अशा महिलांची गरज असल्याचं म्हटलंय.
Who Is Simran Bala
Esakal
महिला अधिकारी फक्त सहाय्यकाच्या भूमिकेत नाहीत तर फ्रंटलाइन आणि नेतृत्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
Who Is Simran Bala
Esakal
७७व्या प्रजासत्ताक दिनी सिमरन बाला पुरुषांच्या तुकडीचं नेतृत्व करेल तेव्हा ती फक्त परेड नसेल तर एक ऐतिहासिक अशी परेड असणार आहे.
Who Is Simran Bala
Esakal
ARMY Full Form
ESakal