रोहित कणसे
आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यांदरम्यान बऱ्याचदा काव्या मारन यांना स्टेडियममध्ये टीमला चीअर करताना पाहिलं असेल.
एसआरएच संघाची मालकीन असलेल्या काव्या यांचे फोटो आणि व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतता.
एसआरएचला हार्डकोर सपोर्ट करणाऱ्या काव्या मारन नेमक्या आहेत कोण ? हेच आज आपण जाणून घेणार आहोत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, काव्या मारन यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या लिओनार्ड एन स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीएची पदवी घेतली आहे.
तसेच चेन्नईच्या स्टेला मॅरिस कॉलेजमधून बी.कॉम पूर्ण केलेल्या काव्या या सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीच्या सीईओ आहेत.
काव्या यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडील कलानिधी मारन यांना त्यांच्या व्यवसायात मदत करण्यास सुरूवात केली, कलानिधी मारन हे सन टीव्ही नेटवर्कचे मालक आहेत.
चेन्नईमध्ये 6 ऑगस्ट 1992 रोजी जन्मलेल्या काव्या मारन यांचा 2019 मध्ये सन टीव्ही नेटवर्कच्या डायरेक्टर्स पॅनलमध्ये समावेश करण्यात आला होता.
काव्या मारन यांना क्रिकेटमध्ये प्रचंड रस असून त्या आयपीएलमधील खेळाडूंच्या लिलावात बोली लावतानाही दिसतात, त्यामुळे संघासाठी खेळाडूंच्या निवडीतही त्यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट होते.
सान्या मल्होत्रा पुन्हा दिसणार शाहरुख खानसोबत