Aarti Badade
खान सर हे भारतातील प्रसिद्ध शिक्षक आणि युट्यूब कंटेंट क्रिएटर असून त्यांचे 'खान जीएस रिसर्च सेंटर' हे चॅनल विशेष प्रसिद्ध आहे.
त्यांचा जन्म 1993 मध्ये उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला असून ते मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबातून आले आहेत.
त्यांनी बी.एस्सी., एम.एस्सी. आणि भूगोलात मास्टर्स पदवी मिळवली असून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
फक्त ६ विद्यार्थ्यांपासून सुरुवात करून त्यांनी आज २.४ कोटींहून अधिक युट्यूब सबस्क्रायबर मिळवले आहेत.
एका अहवालानुसार, खान सर यांचे मासिक उत्पन्न सुमारे १०-१२ लाख रुपये असून त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ५ कोटी रुपये आहे.
त्यांनी त्यांच्या लाईव्ह क्लासमध्ये गुप्तपणे लग्न केल्याची माहिती दिली असून हे लग्न भारत-पाक युद्धाच्या काळात झाले होते.
शिक्षण हे समाजसेवेचे साधन मानणारे खान सर कमी शुल्कात कोचिंग देत गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.