सूरज यादव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा आणि राजाराम महाराजांची पत्नी इतकीच महाराणी ताराराणींची ओळख नाही. दोन्ही छत्रपतींनंतर त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं.
Maharani Tararani
Esakal
मराठ्यांवर चालून आलेल्या शत्रूला स्वत: हातात तलवार घेऊन महाराणी ताराराणी यांनी लढा दिला. मोगलमर्दिनी, रणरागिणी आणि करवीर संस्थापिका महाराणी ताराराणी अशी त्यांची ओळख आहे.
Maharani Tararani
Esakal
राजाराम महाराजांच्या निधनावेळी ताराराणींचं वय २५ वर्षे होतं. त्यावेळी औरंगजेबाच्या फौजेशी त्यांनी लढा दिला. औरंगजेब त्याच्या संपूर्ण फौजेसह महाराष्ट्रात तळ ठोकून होता.
Maharani Tararani
Esakal
मराठ्यांचं राज्य सहज जिंकू अशा अविर्भावात असलेल्या औरंगजेबाला ताराराणी यांनी स्वराज्यातच गाडलं. तब्बल ७ वर्षे त्यांनी औरंगजेबाविरुद्ध लढा देत स्वराज्य वाचवलं.
Maharani Tararani
Esakal
छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंकडे उत्तराधिकार जायला हवे होते. पण ते वयाने लहान असल्यानं आणि मोगलांच्या कैदेत असल्यानं ताराराणींनी सर्व सूत्रे हाती घेतली.
Maharani Tararani
Esakal
शाहू मोगलांच्या कैदेतून वारसाचा वाद निर्माण झाल्यानंतर कोल्हापूरला मराठ्यांची गादी स्थापन करून त्यांनी राज्य केलं. स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या आहेत.
Maharani Tararani
Esakal
महाराणी ताराराणी या बुद्धिमान, तडफदार होत्या. घोडेस्वारीत निपुण असलेल्या ताराराणींना युद्धकौशल्य आणि राजकारणाचं बाळकडू मिळालं होतं.
Maharani Tararani
Esakal
मराठा साम्राज्याचं रक्षण करणाऱ्या आणि ते सक्षमपणे सांभाळणाऱ्या ताराराणींचं वयाच्या ८६ व्या वर्षी सिंहगडावर निधन झालं.
Maharani Tararani
Esakal
Longest War in History
Esakal