Saisimran Ghashi
पॅरलिसिसमध्ये मेंदूचा रक्तपुरवठा अडवल्यामुळे मेंदूच्या पेशी मरण पावतात. यामुळे जीवाला धोका पोहोचतो आणि वेळेवर उपचार न केल्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते.
संशोधनानुसार, पुरुषांपेक्षा महिलांना ब्रेन स्ट्रोकचा धोका जास्त असतो. केवळ धोका नव्हे तर स्ट्रोकनंतर गुंतागुंत होण्याची शक्यताही महिलांमध्ये अधिक असते.
महिलांमध्ये वय वाढल्यावर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर, स्ट्रोकचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो. हार्मोनल बदल, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती यांचा पॅरलिसिसच्या जोखिमीवर परिणाम होतो.
गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर, प्री-एक्लेम्पसिया (गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब) यामुळे महिलांना पॅरलिसिसचा धोका अधिक होतो.
महिलांना नैराश्य, मायग्रेन व तणाव यासारख्या मानसिक समस्यांचा त्रास अधिक असतो. या सर्व गोष्टी स्ट्रोकच्या धोका वाढवणाऱ्या घटकांमध्ये मोडतात.
अनेक वेळा महिला झटक्याची लक्षणे गांभीर्याने घेत नाहीत किंवा उशिरा वैद्यकीय मदत घेतात. त्यामुळे योग्य वेळी उपचार न झाल्याने धोका वाढतो.
तोंड सुन्न होणे, बोलण्यात अडचण, डोकेदुखी, दृष्टी कमी होणे, चालण्यात असंतुलन अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे, कारण प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.