Saisimran Ghashi
गोकर्णमधील गुहेत दोन मुलांसह राहणारी रशियन महिला सध्या चर्चेत आली आहे.
निना कुटीना ही रशियन महिला २०१७ पासून भारतात व्हिसा संपूनही राहत होती.
ती कर्नाटकच्या गोकार्णा येथील रामतीर्था डोंगरावरील गुहेत आपल्या दोन मुलांसह राहत होती.
नीना कुटीना ही ध्यानधारणा आणि आध्यात्मिक साधनेसाठी भारतात आली होती, असे तिचे म्हणणे आहे.
पोलिस आणि प्रशासनाने गुहेत जाऊन नीना आणि तिच्या मुलांना तिथून बाहेर काढले.
गेल्या १५ वर्षांत तिने सुमारे २० देशांचा प्रवास केला. तिची मुले वेगवेगळ्या देशांमध्ये जन्माला आली आहेत.
विशेष म्हणजे, तिने कोणत्याही डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या मदतीशिवाय स्वतःच प्रसूती केली.
निना कला, संगीत व्हिडीओ, मुलांची देखभाल व शिकवण्याद्वारे ती पैसे कमवते.
गोकर्णच्या जंगलात गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेचा पती म्हणतो, "तिने मला न सांगता गोवा सोडलं." मुलींसाठी कायदेशीर लढा सुरू आहे.