kimaya narayan
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानजनक वक्तव्यामुळे अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. हिरकणी अस्तित्वात नव्हती, आग्र्याहून पेटाऱ्यातून नव्हे तर लाच देऊन महाराजांनी सुटका करून घेतली अशी वक्तव्यं केली.
सोशल मीडियावर आणि राजकीय लोकांनीही टीका केल्यानंतर राहुल यांनी दिलगिरी व्यक्त केली. पण आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पुण्याबाहेरील घराबाहेर आंदोलन केलं. पण राहुल सोलापूरकर नेमके कोण आहेत ? त्यांच्या गाजलेल्या भूमिका याविषयी जाणून घेऊया.
राहुल गेली 40 वर्षं अभिनयक्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटक-सिनेमांमध्ये काम केलंय. 1988 मध्ये रिलीज झालेल्या थरथराट सिनेमातील टकलू हैवान ही खलनायकाची भूमिका खूप गाजली आणि यामुळेच त्यांना ओळख मिळाली.
यानंतर त्यांनी साकारलेली गाजलेली भूमिका म्हणजे लाल गेंडा. धुमाकूळ सिनेमात त्यांनी ही खलनायकी भूमिका साकारली होती. या सिनेमात विजय चव्हाण आणि प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका होती.
राहुल सोलापूरकर यांची गाजलेली भूमिका म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांची. ‘राजर्षी छत्रपती शाहू’ या मालिकेत त्यांनी पहिल्यांदा ही भूमिका साकारली. ती हिट ठरल्यानंतर अनेक ऐतिहासिक मालिकांमध्ये ते या भूमिकेतून भेटीस आले.
झी मराठीवरील एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत त्यांनी कुहूच्या पैलवान सासऱ्यांची भूमिका साकारली होती.
आजवर त्यांनी ‘मृगनयनी’, ‘अवंतिका’, ‘नंदादीप’, ‘नूपुर’, ‘बाजीराव मस्तानी’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
दरम्यान सध्या सुरु झालेल्या राजकीय गदारोळामुळे राहुल सगळ्यांची बिनशर्त माफी मागणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहील आहे.