Sandip Kapde
राष्ट्रवादीचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे याच्या सुनेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
मृत महिलेचं नाव वैष्णवी हगवणे असून तिने आत्महत्या केली आहे, असा पोलिसांचा दावा आहे.
पोस्टमार्टम अहवालात मारहाणीचा उल्लेख असल्यामुळे प्रकरण गंभीर बनले आहे. गळा दाबल्यामुळे मृत्यू झाल्याचे देखील म्हटले आहे.
या घटनेत राजेंद्र हगवणे याचे नाव समोर आल्याने ‘ते नेमके कोण?’ अशी चर्चा रंगली आहे.
पोलिसांनी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक केली, सासरे राजेंद्र हगवणे फरार होता. त्याला देखील आज अटक झाली
या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून लोकांमध्ये संताप आहे.
राजेंद्र हगवणे हा अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष होता त्यामुळे त्याला अटक होत नसल्याची चर्चा होती
अधिक तपासासाठी पोलिसांची विशेष पथक तैनात करण्यात आले आहे.
मोठ्या सुनेने देखील सासरच्यांवर मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत.
राजेंद्र हगवणे याने २००४ साली मुळशी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
वैष्णवीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेंद्र हगवणे याची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सुरज चव्हाण यांनी दिली.