Mayur Ratnaparkhe
रवनीत सिंग बिट्टू हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू आहेत.
रवनीत सिंग बिट्टू सध्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करतात.
त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालय आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे.
भाजपमध्ये येण्यापूर्वी रवनीत सिंग बिट्टू काँग्रेसमध्ये होते. ते मार्च २०२४ मध्ये भाजपमध्ये सामील झाले.
२०२४ मध्ये भारतीय जनता पक्षात सामील झाल्यानंतर ते राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत लुधियानामधून त्यांचा पराभव झाला होता.
बिट्टू यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली.
२०१४ आणि २०१९ मध्ये त्यांनी लुधियाना मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली