PM मोदींचे 'खास दोस्त' पडले प्रेमात! त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान असलेली त्यांची नवीन Girlfriend कोण?

सकाळ डिजिटल टीम

Vladimuir Putin Ekaterina Katya Mizulina : जागतिक नेते आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या प्रेम प्रकरणाच्या नेहमीच चर्चेत असतात. पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास मित्र आहेत, त्यामुळं पुतिन यांच्या प्रेमकथा भारतातही फेमस आहेत.

Ekaterina Katya Mizulina

71 वर्षीय पुतिन यांची नवीन मैत्रीण त्यांच्यापेक्षा 30 वर्षांनी लहान आहे. चला जाणून घेऊया कोण आहे एकातेरिना कात्या मिझुलिना? रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची गर्लफ्रेन्ड एकातेरिना मिझुलिना ही पुतिन समर्थक आणि युक्रेनविरोधी सिनेटर अॅलेना मिझुलिना यांची मुलगी आहे.

Ekaterina Katya Mizulina

एकातेरिना मिझुलिना पुतिनपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेल्या सिनेटर अॅलेना मिझुलिना यांची मुलगी आहे. एकातेरिना कात्या मिझुलिना आजकाल रशियन मीडियामध्ये नेहमीच चर्चेत असतात.

Ekaterina Katya Mizulina

एकातेरिना मिझुलिना ही एक रशियन व्यक्ती असून 2017 ते 2020 पर्यंत त्या नॅशनल सेंटर फॉर चिल्ड्रेन असिस्टन्सच्या कार्यकारी संचालक होत्या.

Ekaterina Katya Mizulina

एकातेरिना मिझुलिना यांचा जन्म 1 सप्टेंबर 1984 रोजी यारोस्लाव्हल येथे झाला. 2004 मध्ये त्यांनी लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून पदवी प्राप्त केलीये.

Ekaterina Katya Mizulina

त्यांनी 2010 मध्ये आशियाई आणि आफ्रिकन देशांच्या संस्थेतून पुढील शिक्षण घेतले. मिझुलिना 2015 पासून धर्मादाय क्षेत्रात काम करत आहेत. 2017 मध्ये त्यांना असोसिएशन ऑफ इंटरनेट इंडस्ट्री मार्केट पार्टिसिपंट्स सेफ इंटरनेट लीगच्या संचालक म्हणून नियुक्त केले.

Ekaterina Katya Mizulina

मिझुलिना यांची 2018 मध्ये नॅशनल मॉनिटरिंग सेंटर फॉर असिस्टन्स टू मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रनचे कार्यकारी संचालक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, युक्रेनियन मीडियामध्ये दावा करण्यात आलाय की, 'पुतिन एका मुलीच्या प्रेमात पडले असून तिचं नाव मिझुलिना आहे. ते दोघेही प्रेमात आहेत.'

Ekaterina Katya Mizulina

Kisan Andolan 2.0 : शंभू-जिंद सीमेवर प्रचंड तणाव; पोलिसांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखलं