Anuradha Vipat
अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या अभिनयाबरोबर फोटो आणि व्हिडीओमुळे नेहमी चर्चेत असते.
सईच्या अभिनयाचा जितका चाहता वर्ग आहे तितकाच तिच्या सौंदर्याचा चाहता वर्ग तयार झाला आहे.
सध्या सईच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हिडीओमध्ये सईने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीचा खुलासा केला आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील सईची लाडकी व्यक्ती म्हणजे प्रसाद ओक आहे.
ती प्रसादला ‘पश्याजी’ या नावाने हाक मारते.
सई व्हिडीओमध्ये म्हणाली आहे की, “ही माझी साथी, सवंगडी पश्याजी. आमच्या दोघांमध्ये जर कोणी माइक लावला तर काय होईल याची गॅरंटी आम्ही नाही घेऊ शकतं आणि मला असं वाटतंय शेजारी बसण्यासाठी यापेक्षा चांगली व्यक्ती नसावी.