सकाळ डिजिटल टीम
DC vs PBKS सामन्यात कॅच घेताना लुंगी एनगिडी जोरात मानेवर पडला. दुखापत गंभीर पाहून स्टेडियममध्ये काळजाचा ठोका चुकला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन गेले.
who is ACP Sanjay Singh
esakal
स्टेडियमवर तैनात एसीपी संजय सिंग मदतीला आले. ते स्वतः क्रिकेटर असून त्यांनी विराट कोहली आणि गौतम गंभीर सोबत मैदान गाजवले आहे.
who is ACP Sanjay Singh
esakal
संध्याकाळी ६ वाजेची वेळ म्हणजे दिल्लीचे भीषण ट्रॅफिक. गुगल मॅप्स ३० मिनिटे दाखवत होते, पण न्गिडीसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा होता.
who is ACP Sanjay Singh
esakal
ड्रायव्हर मॅप फॉलो करत होता, पण मला माहित होतं तो अडकेल," एसीपी सिंग यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अनुभवाच्या जोरावर लांबचा पण मोकळा रस्ता निवडला.
who is ACP Sanjay Singh
esakal
एसीपींच्या एका कॉलवर 'ग्रीन कॉरिडॉर' तयार झाला. ६:१६ ला निघालेली अॅम्ब्युलन्स ६:२७ ला हॉस्पिटलमध्ये १० किमीचे अंतर अवघ्या ११ मिनिटांत पार झाले.
who is ACP Sanjay Singh
esakal
न्गिडीला वाचवण्यासाठी ६० ट्रॅफिक पोलीस रस्त्यावर उतरले. एसीपी संजय सिंग वायरलेसवरून सूचना देत होते आणि रस्ते रिकामे होत गेले.
who is ACP Sanjay Singh
esakal
एका माजी क्रिकेटपटूने (एसीपी सिंग) वर्दीत राहून सध्याच्या क्रिकेटपटूचा लुंगी एनगिडी जीव वाचवला. खेळाडूचे मन आणि पोलिसाचे कर्तव्य यांचा हा विजय ठरला!
who is ACP Sanjay Singh
esakal
वेळेवर उपचार मिळाल्याने दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज बचावला. "मी बरा आहे, सर्वांचे आभार," अशी पोस्ट टाकत न्गिडीने चाहत्यांना दिलासा दिला.
who is ACP Sanjay Singh
esakal
top ipl man of the match winners
esakal