सूरज यादव
ठाण्यात शिवसेना भाजपमध्ये सत्तेचा पेच निर्माण झाला होता. मात्र शेवटी शिवसेना शिंदे गटाचा महापौर महापालिकेत बसणार आहे.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
ठाणे महापालिकेच्या महापौर पदी शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका शर्मिला पिंपळोलकर गायकवाड यांनी अर्ज दाखल केलाय.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
महापौर पदासाठी शर्मिला पिंपळोलकर यांच्याशिवाय इतर कुणाचा अर्ज आलेला नाही. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध होणार असून अधिकृत घोषणा ३ फेब्रुवारीला होईल.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचा महापौर तर भाजपचा उपमहापौर होणार आहे. उपमहापौर पदासाठी कृष्णा पाटील यांनी अर्ज केला आहे.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
शर्मिला पिंपळोलकर या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी परिसरातूनच नगरसेविका बनल्या आहेत. दुसऱ्यांदा त्या नगरसेवक झाल्या आहेत.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
महापौरपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर शर्मिला पिंपळोलकर यांनी म्हटलं की, सर्वसामान्य स्त्रीला न्याय दिलाय. मी पदाला न्याय देण्याचं काम करेन आणि संधीचं सोनं करेन.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाचे ७५ तर भाजपचे २८ नगरसेवक निवडून आले आहेत. दरम्यान, भाजपनेसुद्धा महापौरपदासाठी दावा केला होता.
thane mayor sharmila pimplolkar
Esakal
Budget Friendly Foreign Tour
Esakal