मोठ्ठा राकीस! ३५ भाकरी खायचा, नुसतं दूधच प्यायचा; कोण आहे सुखा पाटील?

सकाळ डिजिटल टीम

मुलाखत व्हायरल

सध्या सोशल मीडियावर ३५ भाकरी खाणाऱ्या सुखा पाटील यांचे व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहेत. एका युट्यूब चॅनेलने घेतलेल्या मुलाखतीनंतर ते चर्चेत आले आहेत.

Who is sukha patil

|

Esakal

सुखा पाटील चर्चेत

सुखा पाटील यांच्या मित्रानं ते किती भाकरी खायचे, दूध किती प्यायचे याबद्दल दिलखुलास गप्पा मारल्या होत्या. त्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतायत.

Who is sukha patil

|

Esakal

मंगळवेढ्यात मूळ गाव

सुखा पाटील यांचं नाव सुखदेव क्षीरसागर पाटील असं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घरनिकी हे त्यांचं मूळगाव.

Who is sukha patil

|

Esakal

आजही शेती करतात

सध्या सुखा पाटील हे गादेगाव भागात राहतात. मुलीच्या घरी राहत असलेले सुखा पाटील अजूनही शेती करतात.

Who is sukha patil

|

Esakal

वय ८५ वर्षे

सुखा पाटील यांचा मित्र बजीरंग कोळी यांनी सुखा पाटलांचं केलेलं अतिरंजित वर्णनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुखा पाटील यांचं वय ८५ वर्षे इतकं आहे.

Who is sukha patil

|

Esakal

हल्ल्यात डोळा निकामी

सुखा पाटील यांच्या डोळ्यावर कपाळावर एक खोल जखमेचा व्रणही आहे. त्यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला झाला होता. त्यात एक डोळाही निकामी झालाय.

Who is sukha patil

|

Esakal

सुखा पाटलांचं जेवण

तरुण वयात सुखा पाटील यांच्या जेवणात ३५ भाकरी, भात, दोन तांबे आमटी आणि भरपूर दूध असायचं. कच्चं दूध ते पचवत असत असं बजीरंग कोळींनी सांगितलं होतं.

Who is sukha patil

|

Esakal

कष्टाचं काम

सुखा पाटलांचा आहार जितका जास्त होता तितकंच कष्टाचं कामही असायचं. विहिरीचं पाणी एकट्याने काढायचे, एक हजार कडब्याच्या पेंढ्या एकटे बांधायचे असं बजीरंग कोळी म्हणाले होते.

Who is sukha patil

|

Esakal

H1 बी व्हिसा म्हणजे काय? अमेरिकेनं ६ लाखांवरून थेट ८८ लाख फी केली, भारतीयांना मोठा फटका

US Hikes H1B Visa Fee Indians Hit Hard

|

Esakal

इथं क्लिक करा