सकाळ डिजिटल टीम
१९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंना काही नियम पाळावे लागणार आहेत.
खेळाडूंना या स्पर्धेसाठी कुटुंबियांना आपल्या सोबत घेऊन जाता येणार नाही.
एका सिनियर खेळाडूने पत्नीला दौऱ्यावर नेण्याबाबत BCCIकडे विचारणा केली होती; परंतु त्या खेळाडूला नव्या आचारसंहितेची माहिती देण्यात आली
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये झालेल्या पराभवानंतर, बीसीसीआयने कठोर भूमिका घेत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.
कोणताही क्रिकेटपटू परदेश दौऱ्यावर १५० किलोपेक्षा जास्त सामान घेऊन गेला तर BCCI पैसे देणार नाही.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एक स्टार खेळाडू २७ मोठ्या बॅगा घेऊन आला होता आणि सामानाचे एकूण वजन २५० किलोपेक्षा जास्त होते.
या सामानात १७ बॅट होत्या आणि क्रिकेटपटू व्यतिरिक्त, त्याच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांच्या आणि कुटुंबाच्या सामानाच्या पिशव्या देखील त्यात होत्या.
या क्रिकेटपटूला पाहिल्यानंतर इतर खेळाडूंनीही असेच करायला सुरुवात केली, त्यानंतर BCCIला कठोर कारवाई करावी लागली.
बीसीसीआयच्या सूत्रांनी ही सर्व माहिती देताना तो खेळाडू कोण, हे मात्र सांगितलेलं नाही. पण, नेटिझन्स विराटकडे बोट दाखवत आहेत.