Apurva Kulkarni
हनुमानांना ब्रह्मचर्यातेचं प्रतीक मानलं जातं. त्यांनी संपूर्ण आयुष्य ब्रह्मचारी राहून प्रभू श्रीरामाची सेवा केली.
परंतु अशी कथा आहे की, सूर्यदेवाची कन्या ही हनुमानाची पत्नी होती. तीचं नाव सुर्वचला असं होतं.
हनुमानाने सूर्यदेवाकडे विद्या घेतली होती. ९ पैकी ५ विद्या त्यांनी घेतल्या. परंतु पुढच्या विद्येसाठी विवाह करणं गरजेचं होतं.
त्यामुळे सूर्यदेवतांनी त्यांच्या शक्तीतून एका कन्येला म्हणजेच सुर्वचलेला जन्म दिला. तिच्यासोबत हनुमानांनी विधिवत विवाह केलं. लग्न केल्यानंतर सुर्वचला तप्सचर्या करण्यासाठी गेली.
हनुमान आणि सुर्वचला यांचा विवाह शाब्दिक होता, प्रत्यक्ष सहजीवन नव्हतं, दोघेही ब्रह्मचारीच राहिले.
तेलंगनाच्या खम्मम जिल्ह्यात हनुमान आणि पत्नी सुवर्चला यांचं मंदिर आहे. तिथे पत्नीसोबत हनुमानांची पूजा केली जाते.
दक्षिण भारतातही सुर्वचलेचं नाव अधिक घेतलं जातं. तिथं काही मंदिरात हनुमानासोबत तिची पूजा केली जाते.
हनुमानांनी आयुष्यभर ब्रह्मचारी राहून प्रभू श्रीरामाची सेवा केली. त्यामुळे त्यांना 'अष्टसिद्धी नव निधी के दाता' असंही म्हटलं जातं.