Monika Shinde
यंदा हनुमान जयंती १२ एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे. तुम्हाला माहिती का गावाच्या बाहेर हनुमान मंदिर का असते? चला तर मग जाणून घेऊया
गावाबाहेर हनुमान मंदिर असणे ही महाराष्ट्रासह भारतात अनेक ठिकाणी पाहायला मिळत. पण यामागे आहे खास कारण.
हनुमान हे शक्ती, संयम आणि संरक्षणाचे प्रतीक आहे. म्हणून, त्यांची मंदिरे गावाच्या सीमेजवळ बांधली गेली. याचा अर्थ ते रक्षक आहेत.
प्राचीन काळी, लोकांचा असा विश्वास होता की हनुमान गावाच्या सीमेवर बसले की वाईट शक्ती, दुष्ट आत्मे किंवा भूतांचा धोका गावात येत नाही.
हनुमान हे ब्रह्मचारी व संन्यासी आहे. गावाच्या गोंगाटापासून दूर, एकांत ठिकाणी त्यांची पूजा केली की त्यात अधिक शक्ती व श्रद्धा जाणवते.
हनुमान जयंती आणि शनिवार, यात्रा यासारख्या दिवशी मोठी गर्दी असते. गावाबाहेर एक मंदिर असल्याने, भाविक मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने विधी करतात.
आजही, गावाबाहेर हनुमान मंदिर असणे म्हणजे त्या गावासाठी एक शुभ संकेत आहे. गावात शांतता आणि सुरक्षितता आहे.