Vrushal Karmarkar
छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना गुरुवारी लातूरमधील एका खाजगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
राष्ट्रवादीच्या युवा संघटनेच्या राजकारण्यांनी त्यांच्यावर केलेल्या हल्ल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी ते रुग्णवाहिकेतून मुंबईला रवाना झाले.
यानंतर अजित पवारांनी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंची माध्यमांसमोर भेट घेण्यास नकार दिला आहे. सध्या विजय घाडगे हे चर्चेत आहे.
मात्र विजय घाडगे हे नेमके कोण आहे? त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
विजय घाडगे 17 वर्षाचे असताना ते अखिल भारतीय छावा संघटनेमध्ये जोडले गेले आहेत. त्यांनी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष कामाला सुरूवात केली आहे.
या दरम्यान अण्णासाहेब जावळे पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर संघटनेची धुरा नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडे आली.
यानंतर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्षपदी विजय घाडगे यांची निवड झाली. त्यानंतर 2013 पासून आजपर्यंत ते या पदावर कार्यरत आहेत.
विजय घाडगे हे लातूरमधील औसा तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांनी शेतीच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली आहेत.
यात शेतमालाला हमीभाव, सोयाबीनला भाव, पीक विमा या प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्यांनी औसा येथे आमरण उपोषणही केले आहे. तसेच २०१९ मध्ये १२ दिवसांचे आमरण उपोषण केलं.
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील फी वाढीच्या विरोधात आंदोलन झाले होते. या आंदोलनात विजय घाडगेंनी सहभाग घेतला होता. याचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
थोडंसं काम... पण तरीही दम लागतोय? ही 5 कारणं लक्षात घ्या!