Monika Shinde
"तो एक देव नव्हे, तो अनुभव आहे… तो भक्ताच्या हृदयात वसणारा विश्वास आहे."
"नाम घेताच विठ्ठल समोर उभा!" म्हणजेच विठ्ठल हा नामस्मरणात प्रकट होणारा साक्षात देव आहे. भक्ताच्या मनात स्थिरावणारा, तो अंतःकरणातील तेज आहे.
आई-वडिलांची सेवा करत असताना पुंडलिकाने देवासाठी वीट ठेवली. विठोबा त्या वीटेवर उभा राहिला आणि जिथे देव थांबतो, तिथेच ती भूमी पवित्र होते…पंढरपूर जन्माला आलं.
पुंडलिकासाठी विठ्ठल म्हणजे मातृ-पितृ भक्तीचं प्रतीक आहे.
सात श्लोकांचं प्रेमपत्र विठ्ठलाला! रुक्मिणीच्या प्रीतीतूनच भक्तीचा जन्म झाला. तिचं प्रेम म्हणजे देवत्वाचं गोड रूप आहे.
जय जय राम कृष्ण हरी" च्या गजरात सापडलेली आत्मशांती. वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात नाचणारा निळा देव आहे.
तुकाराम, नामदेव, एकनाथ, ज्ञानेश्वर…सर्व संतांचं एकच ध्येय "विठ्ठल दर्शन" हृदयातील आत्मदर्शन!
तो तुझ्या मनात आहे… तो श्रद्धेत आहे…तो प्रत्येक "जय हरी विठ्ठल!" मध्ये आहे.