Anushka Tapshalkar
नाकाभोवती गुलाबी रंगाचे २२ लवचिक तंतू (प्रत्येक बाजूला ११) असलेला, ज्यांच्या मदतीने अन्न शोधण्याचं काम केलं जातं असा स्टार-नोज्ड मोल जगातल्या सर्वात विचित्र प्राण्यांपैकी एक आहे.
त्याची शेपटी जवळपास शरीराएवढी लांब असते, हिवाळ्यात ती फॅट स्टोरेजसाठी सुजते. शरीरावर काळसर-तपकिरी लांब फर असते.
हा प्राणी मुख्यतः दलदली, ओलसर माती, गवताळ प्रदेश आणि जंगलांमध्ये वास्तव्य करतो. तो जमिनीखाली ६० सें.मी.पर्यंत बिळं खोदतो.
हा मोल जमिनीतील कीटक, अळ्या आणि पाण्यातील जंतूंवर उपजीविका करतो. आपल्या टेन्टॅकल्सच्या साहाय्याने तो पाण्याखालीही अन्न शोधतो.
हा दिवस आणि रात्र दोन्ही काळात कार्यशील असतो. पाण्यात उत्कृष्ट पोहतो आणि ताशी ६-८ किमी वेगाने धावू शकतो.
एप्रिल ते जुलैच्या काळात मादी एकदाच पिल्लांना जन्म देते; प्रत्येक वेळी २ ते ७ पिल्लं असतात. पिल्लं जन्मतः आंधळी आणि केस नसलेली असतात.
घुबडं, कोल्हे, मिंक, पाईक मासे हे मोलचे प्रमुख शत्रू आहेत. काही वेळा मोल एकत्र किंवा वसाहतीत राहतात, परंतु त्यांची सामाजिक रचना अद्याप गूढ आहे.
Etruscan Shrew - World's Smallest Animal
sakal