सकाळ वत्तसेवा
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याभोवती गूढतेचे वलय कायम आहे. त्यांचा मृत्यू कट होता का? गुमनामी बाबा म्हणजे नेताजीच का? असे प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
नेताजींनी आझाद हिंद सेनेसाठी जगभरातील भारतीयांकडून मदत घेतली होती. मोठमोठ्या देणग्या गोळा करून एक महाखजिना तयार करण्यात आला.
रंगूनमध्ये एका सभेत हबीब नावाच्या व्यक्तीने नेताजींना १.३ कोटी रुपये दिले. एका महिलेनं लाखोंचा मोत्यांचा हार अर्पण केला.
रंगूनचे प्रसिद्ध व्यापारी चलैया नाडर यांनी नेताजींना ४२ कोटी रुपयांची देणगी दिली. हा खजिना पुढे आझाद हिंद सेनेसाठी वापरण्यात आला.
नेताजींनी हा खजिना १७ बॉक्समध्ये भरून थायलंड व सिंगापूरला हलवला. जपानी अधिकाऱ्यांच्या मते नेताजींकडे १५० किलो सोनं होतं.
विमान अपघाताच्या वेळी नेताजींसोबत दोन चामड्याच्या बॉक्समध्ये जवळपास ४० किलो दागिने आणि सोनं होतं. मात्र, अपघातानंतर खजिना गायब झाला.
१९५१ मध्ये हा खजिना टोकियोहून भारतीय दूतावासात आणण्यात आला. पण १५० किलो सोन्यातून फक्त ११ किलोच उरले!
आज हा खजिना राष्ट्रपती भवनातील राष्ट्रीय संग्रहालयात आहे. मात्र उरलेला मोठा हिस्सा अद्याप सापडलेला नाही.
अनेक इतिहास संशोधक आणि नेताजींच्या अनुयायांनी हा खजिना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नेमका कुठे गेला, याचा शोध अजूनही सुरूच आहे.