Aarti Badade
माऊलींचा अश्व अंकलीहून आळंदीला पायीच येतो. ही 190 वर्षांची जुनी परंपरा आहे. त्याबद्दल जाणून घेऊया.
श्रीमंत शितोळे सरकार यांचा अश्व आहे. तो ज्येष्ठ शुद्ध ११ ला अंकली (बेळगाव) येथून निघतो. हा अश्व ११ दिवस पायी चालत आळंदीला पोहोचतो.
हा अश्व परंपरेचा आणि श्रद्धेचा भाग आहे. या अश्वावर कोणीही स्वार नसतो. कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय तो श्रीमाऊलींच्या सेवेत चालतो.
अश्व आळंदीत पोहोचल्यावर इंद्रायणी नदीच्या पुलावर त्याचे स्वागत होते. श्रीमंतांचे प्रतिनिधी मंदिरात अश्वाच्या आगमनाची माहिती देतात.
हैबतबाबांची दिंडी अश्वाला सामोरी जाते. तिथे अश्वाचे पूजन होते. नंतर वाजतगाजत त्याला मंदिरात नेले जाते.
अश्व मंदिरात आल्यावर त्याचे पायघड्या घालून स्वागत केले जाते. हा क्षण भक्तांसाठी खूप पवित्र असतो.
हा अश्व ज्या गावांतून जातो, तेथील भक्त त्याचे दर्शन घेतात. कारण, त्याला केलेला नमस्कार विठ्ठलापर्यंत पोहोचतो, अशी त्यांची श्रद्धा आहे.
शितोळे घराण्याकडे गेल्या १९० वर्षांपासून माऊलीच्या अश्वाचा मान आहे. ऊर्जितसिंह राजे शितोळे सरकार आणि त्यांचे पुत्र महादजीराजे आजही हा मान जपत आहेत.
रोज पहाटे ४ वाजता चोपदार अश्वाला निमंत्रण देतात. सकाळी साडेपाचला अश्व माऊलींच्या पादुकांकडे येतो. त्याला हार घालून पुढे मार्गस्थ केले जाते.
माऊलींचा अश्व ही केवळ एक प्रथा नाही. ती श्रद्धा, निष्ठा आणि वारकरी भक्तीचे प्रतीक आहे. ही परंपरा आजही तितक्याच भक्तीभावाने जपली जाते.