IPL Final मध्ये ट्रॉफी घेऊन मैदानात आलेली नागपूरची लेक!

सकाळ डिजिटल टीम

IPL 2026 Final

आयपीएल २०२६ स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात झाला.

RCB vs GT

|

Sakal

RCB जिंकले विजेतेपद

अंतिम सामन्यात बंगळुरूने गुजरातला पराभूत करत दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकले.

Royal Challengers Bengaluru 

|

Sakal

IPL ट्रॉफी घेऊन आली साडीतील तरुणी

पण या सामन्यानंतर विजेतेपदाची आयपीएल ट्रॉफी मैदानात एक चॉकलेटी रंगाची साडी घातलेल्या तरुणीने आणली. त्यामुळे ती नक्की कोण आहे, अशी चर्चाही सुरू झाली.

IPL Trophy

|

Sakal

नागपूरची लेक

तर ती आयपीएल ट्रॉफी मैदानात घेऊन येणारी तरुणी नागपूरची सई महाकाळकर आहे.

Saiee Mahakalkar, Nagpur Girl Who Carried IPL Trophy

|

Instagram

शिक्षण

सई महाकाळकर ही फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेत आहे. ती बडोदामधील पारुल विद्यापीठातून शिक्षण घेत आहे.

Saiee Mahakalkar, Nagpur Girl Who Carried IPL Trophy

|

Instagram/saieee_m

आयपीएलसाठी निवड

तिच्या कॉलेजच्या शिक्षकांनी तिला आयपीएलच्या या कार्यकमाच्या ऑडिशनबाबत सांगितलं होतं. त्यात तिची निवड झाली आणि ती आयपीएलच्या अंतिम सामन्यावेळी ट्रॉफी घेऊन आली.

Saiee Mahakalkar, Nagpur Girl Who Carried IPL Trophy

|

Instagram

कटेंट क्रिएटर

सई ही लाईफस्टाईल कटेंट क्रिएटरही असून तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटला हजारो फॉलोवर्स आहेत. तिने ओडिशातील कोणार्क सूर्य मंदिराच्या परिसरात फिफा महिला वर्ल्ड कपसाठी विशेष शूट देखील केले आहे.

Saiee Mahakalkar, Nagpur Girl Who Carried IPL Trophy

|

Instagram

वैभव सूर्यवंशीचा नवा हेअरकट कोणता? नवा लूक चर्चेत

Vaibhav Sooryavanshi New Hairstyle

|

Sakal 

येथे क्लिक करा.