Aarti Badade
आंबा वजन वाढवत नाही. तो सोडियममुक्त आणि कोलेस्ट्रॉलमुक्त असून, जीवनसत्त्वे, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फायबरने समृद्ध आहे.
आंब्यात जीवनसत्त्वे A, C, B6, आणि मिनरल्स जसे की लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात.
ज्याना मुळव्याधचा त्रास आहे त्यांनी आंबा खाणे टाळावे. आंबा हा उष्ण पदार्थ आहे तो त्रास वाढवू शकतो.
आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 55 पेक्षा कमी असतो, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी तो सुरक्षित आहे. दिवसातून एक आंबा खाणे फायदेशीर आहे. त्याहून जास्त आंबे खाणे मधुमेह असणाऱ्यानी टाळावे.
गर्भवती महिलांसाठी आंबा खाणं फायदेशीर आहे, पण प्रमाणाबाहेर सेवन टाळावं. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंबा खावा.
ज्या लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात गॅस होणे या समस्या आहेत त्यांनी आंब्याचे सेवन योग्य प्रमाणात करावे.
कोलेस्ट्रॉल असणाऱ्या लोकांनी आंबा खाऊ नये.
आंबा हा सीजनल असतो व तो खाणे सर्वांनाच आवडतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही त्याचे सेवन कारणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.