शेवग्याची पानं म्हणजे अमृतासारखी, पण 'या' 5 लोकांसाठी ठरू शकतात विष!

Aarti Badade

शेवग्याची पानं एक 'सुपरफूड'!

व्हिटॅमिन सी, ई, लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेल्या शेवग्याच्या पानांना (मोरिंगा) आयुर्वेदात 'मल्टीव्हिटॅमिन' मानले जाते. पण हे सर्वांसाठीच सुरक्षित आहे का?

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

प्रतिकारशक्ती आणि रक्ताची कमतरता

शेवग्याच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) दूर होते आणि रोगप्रतिकारशक्ती प्रचंड वाढते.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

पित्ताचा त्रास असलेल्यांनी जपून!

शेवग्याची पानं निसर्गाने 'उष्ण' असतात. त्यामुळे ज्यांना छातीत जळजळ, पित्त किंवा आंबट ढेकर येण्याचा त्रास आहे, त्यांनी याचे सेवन टाळावे.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

तोंडात अल्सर किंवा फोड असल्यास...

जर तुमच्या तोंडात वारंवार अल्सर येत असतील, तर मोरिंगा खाणे टाळा. याच्या उष्ण प्रभावामुळे पित्त वाढून तोंडातील जखमा अधिक वेदनादायक होऊ शकतात.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

महिलांसाठी महत्त्वाची सूचना

मासिक पाळीदरम्यान ज्या महिलांना 'हेवी ब्लीडिंग' (जास्त रक्तस्त्राव) होतो, त्यांनी शेवग्याची पानं खाऊ नयेत. यामुळे पित्त दोष वाढून रक्तस्त्राव अधिक वाढू शकतो.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

गर्भधारणा आणि गंभीर आजार

गर्भवती महिलांनी किंवा यकृत (Liver) आणि किडनीच्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मोरिंगाचे सेवन करू नये.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

सेवनाची योग्य पद्धत आणि प्रमाण

मोरिंगा पावडर घेत असाल तर दिवसाला फक्त २ ते ३ ग्रॅमच घ्या. तुम्ही याच्या पानांचे सूप, पराठे किंवा भाजी बनवून आठवड्यातून १-२ वेळा खाऊ शकता.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

आरोग्याचा मंत्र!

निसर्गातील प्रत्येक औषधी वनस्पती योग्य प्रमाणात घेतली तरच ती अमृत ठरते. स्वतःच्या प्रकृतीचा विचार करूनच मोरिंगाचा आहारात समावेश करा.

Who Should Not Eat Moringa

|

Sakal

थंडीत हाडांना मिळेल ताकद! शेवग्याच्या शेंगांचं पौष्टिक सूप ठरेल रामबाण

Drumstick Soup Recipe

|

Sakal

येथे क्लिक करा