Saisimran Ghashi
नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.
पण काही लोकांनी नारळ पाणी टाळावे कारण ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरते.
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत नारळ पाणी पिऊ नये.
नारळ पाण्यात कमी सोडियम आणि जास्त पोटॅशियम असते त्यामुळे सिस्टिक फायब्रोसिसचा त्रास असणाऱ्यांनी हे टाळावे.
किडणीचा, मूत्रपिंडाचा आजार असणाऱ्यांनी नारळ पाणी टाळावे.
जर हृदयासंबंधित आजार असल्यास नारळ पाणी पिऊ नये.
जर तुमचे ऑपरेशन किंवा सर्जरी असल्यास आठवडाभर नारळ पाणी पिऊ नये कारण ते प्यायल्यास ब्लड प्रेशरवर परिणाम होऊ शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.