सकाळ वृत्तसेवा
१७०७ साली औरंगजेबाचा अंत झाला आणि मराठ्यांचं स्वर्णयुग सुरू झाले, संभाजी महाराजांचे बलिदान, राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी स्वराज्य टिकवले, शाहू महाराजांनी साताऱ्याला गादी स्थापन करून मुघल सत्तेला आव्हान दिले.
बाजीराव पेशव्यांनी नर्मदेपलीकडे, नानासाहेबांनी अटकेपार मराठा साम्राज्य विस्तारले, महादजी शिंदेंनी दिल्लीवर वचक बसवला, पेशावर ते तंजावर मराठ्यांचा झेंडा फडकला.
मराठा साम्राज्याच्या यशात सैन्याबरोबरच धनशक्तीचा मोठा वाटा होता. देशभर घोडदौड करणाऱ्या सेनेला सावकारांनी रसद पुरवली. पेशवाईत मराठा साम्राज्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले.
शाहू महाराजांच्या काळात सावकारांचा उदय झाला, वैद्य, दीक्षित, पटवर्धन, भिडे, नाईक यांसारखे सावकार प्रसिद्ध होते. लढाईसाठी कधीही आर्थिक चणचण भासली नाही.
बारामतीकर बाबूजी नाईक हे कोकणातील केळशी गावचे जोशी, केशव नाईक काशीत सावकारी करत होते, तर कृष्णाजी शाहूसोबत दक्षिणेत आले, शाहूंना राज्य मिळेपर्यंत नाईकांनी निधी पुरवला.
सदाशिव नाईकांनी देशभर पेढ्या स्थापन केल्या, बाळाजी विश्वनाथांनी आपली मुलगी भिऊबाई नाईकांना दिली, १७४३ साली बाबूजी नाईकांना बारामतीची जहागीर मिळाली.
पानिपतच्या पराभवानंतर बाबूजींनी माधवराव पेशव्यांना साहाय्य केले, रघुनाथरावांची मुलगी दुर्गाबाई नाईकांच्या मुलाशी विवाहबद्ध झाली, परशुरामभाऊ पटवर्धनांची मुलगीही नाईक कुटुंबात आली.
बाबूजी नाईकांनी कविवर्य मोरोपंतांना आश्रय दिला, बारामतीत कऱ्हा नदीकाठी वाडा बांधून मोरोपंतांना भेट दिला, १७८० साली बाबूजींचा मृत्यू झाला पण त्यांचे योगदान अजरामर आहे.
सरकारने बाबूजी नाईकांच्या वाड्याची पुनर्बांधणी केली, बारामतीचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जगासमोर आला, बाबूजी नाईकांनी बारामतीला पहिली ओळख दिली.