Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते.
महाराजांनी नेहमीच प्रेजेच्या कल्याणासाठी कार्य केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक खास लोक होते, गुप्तहेर होते.
पण तुम्हाला माहिती आहे का, छत्रपती शिवाजी महाराजांची सर्वात जवळची व्यक्ती कोण होती?
शिवाजी महाराजांनी मावळ प्रदेशातून स्वराज्याची स्थापना केली.
बाजीप्रभू देशपांडे आणि दादाजी नरसप्रभू देशपांडे हे स्वराज्य उभारणीत त्यांच्या सोबत असलेले त्यांचे मोजके सहकारी होते.
येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नऱ्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जिवा महाला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेधे हे काही जवळचे लोक होते.
बाजी पासलकर आणि येसाजी कंक हे दोन महाराजांचे निकटवर्तीय सहकारी होते.