१७५ वर्षानंतर समाधी सापडली पण सिंथिया फरारबाई कोण होत्या?

Sandip Kapde

समाधी

जवळपास पावणेदोनशे वर्षे अज्ञात राहिलेली सिंथिया फरारबाईंची समाधी अहिल्यानगरमध्ये सापडली असून, संशोधकांनी तिची स्वच्छता करून फुले वाहत त्यांना आदरांजली अर्पण केली.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

ठिकाण

अहिल्यानगरमधील बुऱ्हाणनगर परिसरातील सेंट झेव्हियर्स कब्रस्तानात असलेली सिंथिया फरारबाईंची दगडी समाधी आजही चांगल्या स्थितीत आहे.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

ओळख

या समाधीवर अमेरिकन मिशनरी सिंथिया फरार यांचे नाव स्पष्टपणे कोरलेले असून, त्यांच्या कार्याची ऐतिहासिक आठवण आजही जपली गेली आहे.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

परिचय

सिंथिया फरार या अमेरिकन ख्रिस्ती मिशनरी, शिक्षिका आणि भारतातील स्त्री-शिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या म्हणून ओळखल्या जातात.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

जन्म

सिंथिया फरार यांचा जन्म २० एप्रिल १७९५ रोजी अमेरिकेतील न्यू हॅम्पशायर येथे झाला होता.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

भारतप्रवेश

२९ डिसेंबर १८२७ रोजी अमेरिकन मराठी मिशनच्या माध्यमातून त्या मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांनी भारतात शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

शिक्षणकार्य

मुंबई आणि अहिल्यानगर येथे मुलींसाठी शाळा स्थापन करून त्यांनी मुलींच्या शिक्षणाचा प्रसार केला आणि सामाजिक विरोधाला सामोरे जात वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचवले.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

प्रेरणा

१८४८ मध्ये महात्मा जोतिराव फुले यांनी अहिल्यानगरमधील फरारबाईंच्या शाळेला भेट दिली आणि तेथील शैक्षणिक व्यवस्था पाहून पुण्यात मुलींची शाळा सुरू करण्याची प्रेरणा घेतली.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

प्रशिक्षण

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून घडवण्यासाठी आवश्यक अध्यापनाचे व्यावहारिक प्रशिक्षण सिंथिया फरार यांनी दिल्याचे सांगितले जाते.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

सहकार्य

फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याशी संबंधित फातिमा शेख यांनीही अहिल्यानगरमधील फरारबाईंच्या शाळेत शिक्षण व प्रशिक्षण घेतले होते.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

समर्पण

भारतातील स्त्री-शिक्षणासाठी सिंथिया फरार यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल ३४ वर्षे समर्पित केली आणि मुलींच्या शिक्षणाच्या प्रसारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

निधन

२५ जानेवारी १८६२ रोजी अहिल्यानगर येथे सिंथिया फरार यांचे निधन झाले, मात्र महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक प्रवासाशी जोडलेले त्यांचे कार्य आजही स्मरणात आहे.

Who Was Cynthia Farrar

|

esakal

फक्त २३८ लोकांचं जग! समुद्राच्या मध्यभागी वसलेलं 'हे' बेट पाहिलंय का? माणसं कशी जगतात? 

Tristan da Cunha, one of the world’s most remote inhabited islands, located in the South Atlantic Ocean

|

esakal

येथे क्लिक करा