Vrushal Karmarkar
राजकीय सत्ता आणि प्रतिष्ठेच्या मोहात पेशवाईत अनेक 'तोतया' उदयास आले. क्षणिक यशानंतर त्यांना शिक्षा अटळ होती.
ब्रहेंद्रस्वामींच्या मृत्यूनंतर त्यांचा तोतया प्रकटला. नानासाहेब पेशव्यांनी त्याचा भांडाफोड करून १०० फटके व जन्मठेपेची शिक्षा दिली.
पानिपत युद्धात वीरमरणानंतर जनकोजी शिंदे यांचे तोतये उत्तरेत आले. शिंदे घराण्यानेच त्यांना उघड केले.
रघुजी थोरात हा जनकोजी शिंदेचा तोतया होता. नातेवाईकांनी ओळखताच त्याचे नाक-कान कापून हद्दपार केले; त्याने आत्महत्या केली.
पानिपत युद्धात बापूजी फडके बेपत्ता झाल्यावर पुण्यात त्यांचा तोतया आला. मोरोबादादा भानूंना पद मिळताच तो फरार झाला.
काशी, नरवर व कर्नाटकात तीन 'भाऊ' प्रकटले. सर्वांना मृत्यूदंड किंवा कैद झाली.
एक वऱ्हाडात, दुसरा काशीत. दुसऱ्याला इंग्रजांच्या स्वाधीन केले. मूळ अमृतराव सुरतमध्ये होते.
१८२२ मध्ये बऱ्हाणपूरला एक स्त्री यशोदाबाई म्हणून प्रकटली. तिने ४४ वर्षं इंग्रजांकडून तनख्वा (पगार) मागितली.
तोतया हे गुन्हेगार मानले जात. त्यांना आर्थिक दंड, फटके, व्यंग, जन्मठेप किंवा मृत्यूदंड दिला जाई.
पेशवे काळातील साडेतीन फाकडे कोण होते?