Sandip Kapde
आज नाण्यांवर गांधीजींचा फोटो दिसतो, पण पेशवेकाळात नाण्यांवर व्यक्तीचे चित्र नसून मजकूर, नावे आणि चिन्हे असत.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
पेशवेकाळातील नाण्यांना व्यवहारात वेगवेगळी नावे प्रचलित होती आणि ती नाण्यांवरील लिखाणावर आधारित असत.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
दिल्लीच्या बादशहाच्या नावावर असलेली मोहोर ‘आलमगिरी’ या नावाने ओळखली जात असे.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
विजयनगर साम्राज्यातील होन नाणी त्या त्या राजांच्या नावावरून अच्युतरायी किंवा देवरायी अशी ओळखली जात.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
नाणी ज्या शहरात पाडली जात, त्यावरून चांदवडी रुपया किंवा दिल्ली सिक्का अशी नावे रूढ होती.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
टाकसाळ मक्त्याने चालवणाऱ्या व्यक्तींच्या नावावरूनही काही नाणी ओळखली जात असत.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
मल्हार भिकाजी रास्ते यांनी बागलकोट येथे पाडलेल्या रुपयांना मल्हारशाही असे म्हटले जाई.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
पुण्यात दुल्लभशेट या मक्तेदाराने पाडलेल्या मोहोरांना शेटशाही मोहोर असे संबोधले जाई.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
नाण्यांवरील विशिष्ट चिन्हांवरूनही त्यांची वेगळी ओळख निर्माण होत असे.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
चाकण येथील रुपयांवर श्री हे अक्षर असल्यामुळे त्यांना श्री सिक्का असे नाव पडले.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
पुण्यातील काही रुपयांवर गणपतीच्या हातातील अंकुश चिन्ह असल्याने त्यांना अंकुशी रुपया म्हटले जाई.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
विशिष्ट प्रदेशात चालणाऱ्या नाण्यांवरून वसईचाल, पुणेचाल किंवा कल्याणचाल अशी नावे वापरली जात.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
सरकारी व्यवहारासाठी प्रमाण मानले जाणारे पुण्याच्या टाकसाळीतील नाणे हाली सिक्का म्हणून ओळखले जात असे.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
पेशव्यांच्या खजिन्यात स्वीकारली जाणारी नाणी पोतेचाल या नावाने ओळखली जात.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
नाण्यांची शुद्धता तपासल्यानंतर सराफ जे चिन्ह उमटवत, त्या प्रक्रियेला छापणी म्हणत आणि असे नाणे छापी झाले असे समजले जाई.
Who Appeared on Coins on peshwa era
esakal
shivaji maharaj
esakal