अमेरिकन नागरिकत्व मिळवणारा पहिला भारतीय कोण? वाचा 'या' कायदेशीर लढाईची कहाणी...

Mansi Khambe

अमेरिकेचे नागरिकत्व

अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे नेहमीच सोपे नव्हते. विशेषतः २० व्या शतकाच्या सुरुवातीला. त्या काळात, भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणे जवळजवळ अशक्य होते.

American Citizenship

|

ESakal

एका भारतीयाचे अडचणींना आव्हान

पण एका भारतीयाने या अडचणीला आव्हान दिले आणि इतिहास रचला. ही एका माणसाची कहाणी आहे ज्याने कायदेशीर लढाई लढून अमेरिकन नागरिकत्व मिळवले आणि भारतीयांसाठी एक नवीन मार्ग उघडला.

American Citizenship

|

ESakal

वांशिक भेदभाव

त्याच्या प्रयत्नांमुळे भविष्यात भारतीय स्थलांतरितांसाठी मार्ग मोकळा झाला. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्याला कायदा, वांशिक भेदभाव आणि समाजाच्या विचारसरणीशी लढावे लागले.

American Citizenship

|

ESakal

नागरिकत्व कसे मिळवले?

तर हे पहिले भारतीय नागरिक कोण होते? त्यांनी नागरिकत्व कसे मिळवले? ही कहाणी तुम्हाला माहिती आहे का?

American Citizenship

|

ESakal

भिकाजी बलसारा

२० व्या शतकाच्या सुरुवातीला, भिकाजी बलसारा हे अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे पहिले भारतीय बनले. ते मुंबईचे कापड व्यापारी होते. त्यांना हे नागरिकत्व मिळवण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागली.

American Citizenship

|

ESakal

नैसर्गिकरण कायदा लागू

त्यावेळी अमेरिकेत १७९० चा नैसर्गिकरण कायदा लागू होता. ज्यानुसार फक्त 'मुक्त गोरे व्यक्तींना' नागरिकत्व दिले जात असे.

American Citizenship

|

ESakal

न्यायालयात युक्तिवाद

बलसारा यांनी न्यायालयात युक्तिवाद केला की, आर्य वंशाचे लोक, ज्यामध्ये कॉकेशियन आणि इंडो-युरोपियन लोकांचा समावेश आहे. त्यांना गोरे मानले जाऊ शकते. १९०६ मध्ये न्यू यॉर्कच्या सर्किट कोर्टात भिकाजी बलसारा यांचा खटला सादर करण्यात आला.

American Citizenship

|

ESakal

सर्किट कोर्ट

न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद फेटाळून लावला. कारण जर त्यांना नागरिकत्व मिळाले तर इतर अरब, हिंदू आणि अफगाण नागरिक देखील अमेरिकन नागरिकत्वाची मागणी करू शकतात.

American Citizenship

|

ESakal

उच्च न्यायालयात अपील

न्यायालयाने त्यांना उच्च न्यायालयात अपील करण्याची परवानगी दिली. १९१० मध्ये, न्यू यॉर्कच्या दक्षिण जिल्ह्याचे न्यायाधीश एमिल हेन्री लाकोम्बे यांनी बलसारा यांना नागरिकत्व दिले.

American Citizenship

|

ESakal

ए.के. मजुमदार

या निर्णयानंतर आणखी एका भारतीय ए.के. मजुमदार यांनाही अमेरिकन नागरिकत्व मिळाले. १९१७ च्या इमिग्रेशन कायद्यानंतर, भारतीयांना अमेरिकेत प्रवेश करणे अधिक कठीण झाले.

American Citizenship

|

ESakal

अमेरिकेचे दरवाजे उघडले

पंजाबी समुदायातील लोक मेक्सिकोमार्गे अमेरिकेत पोहोचले. कॅलिफोर्नियाच्या इम्पीरियल व्हॅलीमध्ये आपला ठसा उमटवला. दुसऱ्या महायुद्धानंतर, भारतीयांसाठी अमेरिकेचे दरवाजे पुन्हा उघडले.

American Citizenship

|

ESakal

Gpay आणि PhonePe कमाई कसे करते? त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत कोणते?

Gpay and PhonePe

|

ESakal

येथे क्लिक करा