अवघे 100 मावळे घेऊन संभाजी महाराजांना वाचवायला धावलेले ज्योत्याजी केसरकर कोण?

Saisimran Ghashi

शिवछत्रपतींचा पराक्रमी वारसा

छत्रपती संभाजी महाराज म्हणजे मराठ्यांच्या संघर्षाचा जाज्वल्य इतिहास! स्वराज्यावर औरंगजेबासह इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, म्हैसूर आदी शत्रूंचे संकट होते, पण त्यांनी सर्वांना समर्थपणे तोंड दिले.

chhatrapti sambhaji maharaj real photos | esakal

फितुरीमुळे संभाजी महाराजांच्या पकडणुकीचा कट

परंतु, शंभूराजांचा पराभव शत्रूने नव्हे, तर स्वकीयांच्या फितुरीमुळे झाला. संगमेश्वर येथे मुकर्र्बखानाने त्यांच्यावर हल्ला केला आणि संभाजी महाराजांना जिवंत पकडले.

how sambhaji maharaj caught | esakal

महाराजांना सोडवण्यासाठी ज्योत्याजी केसरकरांचा प्रयत्न

संगमेश्वर ते बहादूरगड प्रवासात त्यांना वाचवण्यासाठी पहिला हल्ला ज्योत्याजी केसरकर यांनी केला. त्यांनी धनगर मावळ्यांसह मुघलांवर तुटून पडले.

who jyotyaji kesarkar saved sambhaji maharaj | esakal

महाराजांना सोडवण्याचा अपयशी प्रयत्न

उणेपुरे शंभर मावळ्यांनी हजारोंच्या सैन्यावर हल्ला केला, पण संख्याबळ कमी पडल्याने युद्ध हरले. ज्योत्याजी केसरकरही रक्तबंबाळ होऊन कोसळले.

sambhaji maharaj story | esakal

रायाप्पांचा शेवटचा प्रयत्न

संभाजी महाराजांना वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न रायाप्पा यांनी केला, पण मुघलांनी त्यांनाही ठार मारले. शेवटी औरंगजेबाने क्रूरपणे शंभू महाराज व कवी कलशांची क्रूर हत्या केली.

sambhaji maharaj and kavi kalash relation | esakal

औरंगजेबाचा अमानुष छळ

येसूबाई राणींनी रायगडावर संघर्ष सुरू ठेवला, पण पुन्हा फितुरीमुळे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. शाहू महाराजांना कैद करण्यात आले.

aurangzeb inhuman nature cruelty | esakal

शाहू महाराज आणि ज्योत्याजी केसरकरांचे पुनरागमन

पंचवीस वर्षांनी शाहू महाराज परत आले. स्वराज्य पुन्हा उभं करण्याचं मोठं आव्हान होतं. त्यावेळी त्यांना पहिलं साथ दिली ती ज्योत्याजी केसरकर यांनी.

shahu maharaj and jyotyaji kesarkar reunion | esakal

ज्योत्याजी केसरकर यांची आठवण आजही जिवंत

शाहू महाराजांनी त्यांना सरदेशमुखी व १८ कारखान्यांचा अधिकार दिला. आजही पुनाळ गावात ज्योत्याजी केसरकर यांची समाधी वीरगाथा सांगते.

jotyaji kesarkar punal village kolhapur | esakal

छत्रपती संभाजी महाराज कसे दिसायचे? अस्सल दुर्मिळ छायाचित्रे बघाच

how did chhatrapati sambhaji maharaj look like real images | esakal
येथे क्लिक करा