Shubham Banubakode
मंगलम चिन्नास्वामी यांचा जन्म २९ मार्च १९०० रोजी कर्नाटकातील मंड्या येथे झाला. ते पेशाने वकील होते.
१९७७ ते १९८० दरम्यान ते बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच १९६० ते १९६५ दरम्यान बीसीआयचे सचिव होते.
चिन्नस्वामी हे कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते.
एम. चिन्नास्वामी यांनी १९५३ ते १९७८ दरम्यान केसीएचे सचिव, तर १९७८ ते १९९० दरम्यान अध्यक्ष म्हणून काम पाहिलं.
चिन्नास्वामी यांनी १९६५ , १९७३ तसेच १९७७-१९८० दरम्यान आयसीसीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलं.
त्यांच्या प्रयत्नांनीच बंगळुरुत क्रिकेट स्टेडियमची स्थापना झाली. त्याला ‘एम. चिन्नास्वामी यांचं नाव देण्यात आलं.
१९६९-७० दरम्यानच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चिन्नास्वामी भारतीय संघाचे व्यवस्थापक होते.
८ नोव्हेंबर १९९१ मध्ये दीर्घ आजाराने त्यांचे निधन झालं.