Payal Naik
लोकप्रिय मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
त्याने त्याच्या घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच भाष्य केलंय. स्वप्नील घटस्फोटाबद्दल म्हणाला, 'माझा घटस्फोट होत होता तेव्हा सोशल मीडिया नव्हतं.
तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होतं. पण, मराठीतील एकाही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरमध्ये छापलेली नाही. आणि हे मी नेहमी अभिमानाने सांगतो.'
घटस्फोट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडिया पोस्ट टाकाव्या लागतात, की आम्हाला प्रायव्हसी द्या.
एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतून जात असतं. ते दोघेही...चूक कोण आणि बरोबर कोण, हे कोणीही ठरवू शकत नाही. फक्त द्या दोघांना माहीत असतं की काय घडलंय.'
स्वप्निल जोशीची पहिली पत्नी कोण होती याबद्दल आता चर्चा रंगली आहे.
स्वप्निलच्या पहिल्या पत्नीचं नाव अपर्णा जोशी होतं. तीदेखील दातांची डॉक्टर होती.
अकरावीत असताना स्वप्निल आणि अपर्णा यांचं सूत जुळलं. त्यांनी पुढे लग्नही केलं.
मात्र अवघ्या ४ वर्षात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर दोन वर्षांनी स्वप्नीलने लीना आराध्ये हिच्याशी लग्न केलं.
म्हणून झालेलं प्राजक्ता माळीचं ब्रेकअप; म्हणाली- मी त्याला रंगेहात...