Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते.
शिवराय हे प्रत्येकाचे प्रेरणास्थान आहेत.
वाकनवीस म्हणजे मंत्री असा उल्लेख त्या काळात आढळतो.
'मंत्री' हा शब्द संस्कृत भाषेतून आलेला आहे.
शिवाजी महाराजांनी दत्ताजी त्रिमल यांची 'मंत्री' म्हणून नियुक्ती केली होती.
याशिवाय, १६४७ पासून गंगू मंगाजी यांच्याकडे मंत्रिपदाचा कारभार दिला गेला होता.
मंत्री म्हणून राजाचे दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.
दरबारातील घडामोडींचे संकलन करणे हेही त्यांच्या कर्तव्यांपैकी एक होते.
मंत्र्यांना गुप्तचर आणि सैनिक विभागाची कामेही सांभाळावी लागत होती.
राज्याच्या सुरक्षेसाठी माहिती गोळा करणे आणि तपास करणे हे महत्त्वाचे काम होते.
मंत्रीच दरबारी घडणाऱ्या घटना व नोंदी राखून ठेवत असत.
राजपत्रावर मंजूर असलेल्या गोष्टींवर मंत्री आपली निशाणी करत असत.
शिवरायांच्या प्रशासनात मंत्रिपदास अत्यंत महत्त्व होते.
मंत्री लष्करी कामकाजातही सक्रीय सहभाग घेत असत.
त्यामुळे गृहमंत्रीसारख्या जबाबदाऱ्या त्या काळी वाकनवीस किंवा मंत्र्यांकडे होत्या