शिवकाळातील 'शेठ' कोण होते? पोलीस, न्यायाधीश आणि कारभारी सगळं काम एकट्यालाच!

Sandip Kapde

बाजार–

शिवकाळात मुख्य गावांत आठवड्यातून एकदा बाजार भरत असे.

Shivaji Maharaj | esakal

व्यापार–

त्या बाजारांत कापड, नारळ, विड्याची पाने, सुपाऱ्या, फळे-भाज्या आणि मांस यांची खरेदी-विक्री होत असे.

Shivaji Maharaj | esakal

धान्य–

धान्याची विक्रीही बाजारात मोठ्या प्रमाणात होत असे.

Shivaji Maharaj | esakal

शेठ–

अशा बाजाराच्या व्यवस्थेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तीस ‘शेठ’ किंवा ‘श्रेष्ठिन’ म्हणत.

Shivaji Maharaj | esakal

बक्षीस–

शेठाला सेवेसाठी भाडेमुक्त जमीन देण्यात येत असे.

Shivaji Maharaj | esakal

सवलत–

नव्या बाजारपेठेला स्वयंपूर्ण होईपर्यंत सरकार करमाफीची सवलत देत असे.

Shivaji Maharaj | esakal

धोरण–

बाजारपेठेला करमाफी देण्याचे धोरण शिवाजी महाराजांनी सुरू केले आणि पेशव्यांनीही पुढे चालू ठेवले.

Shivaji Maharaj | esakal

कर्तव्य–

बाजारपेठेचा विकास करणे हे शेठाचे मुख्य कर्तव्य असे.

Shivaji Maharaj | esakal

कर–

मुख्य व्यापाऱ्यास दुकानदारांवर लादलेला कर गोळा करण्याची परवानगी असे.

Shivaji Maharaj | esakal

पोलीस–

शेठाला पोलीस आणि न्यायाधीशासारखी कामेही करावी लागत.

Shivaji Maharaj | esakal

Shivaji Maharajग्रामपंचायत–

ग्रामपंचायतीचा सदस्य आणि मिरासदार म्हणून त्याला पेठेत राखीव घर व जागा दिली जात असे.

Shivaji Maharaj | esakal

नोंद–

शेठाला बाजारातील विक्रेत्यांची यादी ठेवावी लागत असे.

Shivaji Maharaj | esakal

जकात –

जकात वसूल करण्याच्या कामात घाटपांड्याला शेठ मदत करी.

Shivaji Maharaj | esakal

साहाय्य–

शेठाला स्थानिक अधिकाऱ्यांना प्रसंगी सहाय्य करावे लागे.

Shivaji Maharaj | esakal

स्थापना–

कधी कधी सरकारच्या सनदेनुसार नवी पेठ स्थापन केली जात असे.

Shivaji Maharaj | esakal

संदर्भ –

“महाराष्ट्राचा इतिहास – मराठा कालखंड (भाग : शिवकाल १६३० ते १७०७)”
लेखक – डॉ. वि. गो. खोबरेकर

Shivaji Maharaj | esakal

शिवाजी महाराजांच्या हत्तींची नावे काय होती?

Shivaji Maharaj elephants name | esakal
येथे क्लिक करा