५० वर्षांपूर्वी लिहिलेलं 'फियाट गाडी' गाणं कुणाचं? पत्र वाचू न शकल्यानं आलेलं रडू

सकाळ डिजिटल टीम

फियाट गाडी गाणं

"दोन घडीचा या गाडीचा ड्रायव्हर बनू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी..." धनगरी कार्यक्रमातील या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा या गीताची चर्चा सुरू झाली.

fiat gadi song

|

Esakal

फियाट गाडी

1960-70 च्या दशकात भारतात आलेली फियाट कार नंतर पद्मिनी म्हणून प्रसिद्ध झाली. त्या काळी ही कार प्रतिष्ठेचं प्रतीक होती आणि अनेकांचं स्वप्न होती. या गाडीवरच वामनदादा कर्डक यांनी गाणं लिहिलं होतं.

fiat gadi

|

Esakal

वामनदादा कर्डक

वामनदादा कर्डक हे आंबेडकरी चळवळीतील शाहीर, कवी, प्रभावी वक्ते होते. 1943 पासून त्यांनी लेखनाला सुरुवात केली आणि हजारो गीतांनी जनजागृती केली.

Vamandada Kardak

|

Esakal

पत्र वाचता आलं नव्हतं

मुंबईत समता सैनिक दलाच्या कार्यक्रमावेळी एकाने पत्र वाचून दाखवायला सांगितलं. पण वामनदादा कर्डक यांना ते वाचताच आलं नाही. तेव्हा लिहिता वाचता येत नसल्यानं डोळ्यात पाणी आलं.

Vamandada Kardak

|

Esakal

लिहायला वाचायला शिकले

पत्राच्या घटनेनंतर त्यांनी वाचायला, लिहायला शिकण्याचा निर्णय घेतला. अक्षरओळख, वाचन, लेखन शिकले आणि मोठे लोककवी झाले.

Vamandada Kardak

|

Esakal

३ हजार गीतं

वामनदादा कर्डक यांनी 3,000 पेक्षा अधिक गीते, पोवाडे, सामाजिक आणि प्रेरणादायी कविता लिहिल्या. वाटचाल आणि मोहोळ हे त्यांचे कवितासंग्रह सुरुवातीला प्रसिद्ध झाले होते.

Vamandada Kardak

|

Esakal

आंबेडकरी चळवळ

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वामनदादांनी आपल्या गीतांचा प्रभावी वापर केला. त्यांच्या काव्याने सामाजिक परिवर्तनाचा संदेश घराघरात पोहोचवला.

Vamandada Kardak

|

Esakal

नाशिक जन्मभूमी

नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या गावात 15 ऑगस्ट 1922 रोजी जन्मलेल्या वामनदादा कर्डक यांची गीते आजही तितकीच लोकप्रिय आहेत.

Vamandada Kardak

|

Esakal

तुमच्या जेवणात वापरलं जाणारं तेल Filtered की Refined? दोन्हीत काय फरक

Filtered and refined oil

|

Esakal

इथं क्लिक करा