Saisimran Ghashi
ऋतिक रोशन आणि सुजैन खान एक वेळी बॉलीवूडचे पावर कपल होते पण लग्नाच्या 14 वर्षानंतर त्यांच्या घटस्फोटाने सगळ्यांना हैराण करून टाकले.
ऋतिक रोशन आणि सुजैन यांचा घटस्फोट का झाला होता हे जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमीच उत्सुक असतात.
नुकतेच सुजैन खानची बहिण फरा खान अली हिच्या पूर्वपतीने या कपलच्या घटस्फोटाचे कारण सांगितल आहे.
सिद्धार्थ कणन सोबत बोलताना डीजे अखिल यांच्या नात्यावर भाष्य केले. ते म्हणाले जेव्हा ऋतिक आणि सुजैन एकत्र होते तेव्हा त्यांची ऋतिक सोबत बोलणे होत असे पण ते सुजैनशी जास्त क्लोज होते.
त्यांनी सांगितले की जेव्हा ऋतिक आणि सुजैनचे नाते अडचणीत होते त्यावेळी त्यांचे देखील त्यांची पत्नी फरा खान अली सोबत नाते इतके ठीक नव्हते.
जेव्हा 2016 साली फेमिना सोबत दिलेल्या इंटरव्यू मध्ये सुजैन खानने प्रतीक सोबत घटस्फोटाचे कारण सांगितले होते.
त्यावेळी सुजैन म्हणाल्या की आता त्यांना ऋतिक सोबत खोट्या नात्यांमध्ये राहावे वाटत नाही.
काही माध्यमांनी दावा केला होता की, ऋतिकचे करीना कपूर, बार्बरा मोरी आणि कतरीना कैफसह अफेअर असल्याच्या अफवा सुजैनला सहन होत नव्हत्या. मात्र, दोघांनी या चर्चा कधीही मान्य केल्या नाहीत.